आम्ही रोज भेटायचो नाहीच जमले तर बोलायचो तेही अगदी मनाच्या तळापर्यंत पोहोचेपर्यंतसगळे नितळ स्वच्छ दिसेपर्यंत...भरलेले आभाळकोसळून पाण्याचा निचरा होईपर्यंत आणि इंद्रधनुष्याचे सप्तरंग डोळ्यांचे पारणे फिटवेपर्यंत


आम्हाला वेळेचे मुळी भानच नसायचेरोजचा नवीन दिवसनव्या गुजगोष्टी.. कधी तलत , मन्ना डे , गुलाम अली तर कधी शमशाद बेगम अनसुर्रेया... सारे भेटीसाठी कायमच हजर असायचे… नवीन काहीतरी वाचलेले,  नवीन कधी सुचलेले एकमेकांना कधी किती सांगूकिती बोलू आणिकिती नको असे होऊन जायचे... कितीही वेळ गेला तरी आमची द्रोपदीची थाळी सदा  कदा भरलेली !! कधी नवे रंगनवे बंध तर कधी आंतरिकनातेसंबंध....... आणि या मनमुराद गप्पानंतर सारे कसे अगदी स्वच्छ - शांतभर उन्हात नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या सरीसारखे,दिलासा देणारेमरगळ घालवणारे आणि प्रफुल्लित करणारे… नव्या सुर्योदयाची नव्याने सुरुवात करून देणारे अन नवरंग फुलवणारे....

मात्र हळूहळू सगळे बदलत गेलेतसे विशेष असे काही घडले नाही पण विनाभेटीचे दिवस विनासायास सरू लागलेओठापर्यंत काहीचपोहोचेनासे झाले , फोन ची जागा sms ने घेतली आणि sms ची जागा e -mail, पुढे पुढे तर ते हि बंद झालेआकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दीहोऊ लागली पण पावसाच्या सरीची चाहूलही लागेनाशी झालीमन्ना डे च्या ऐवजी मुकेश भेटीला येऊ लागलामनातल्या गुजगोष्टींची जागामनातले सल घेऊ लागलेकालांतराने ते सल हि सरले अन आठवणीच काय त्या उरल्या , ज्या अजूनही कधी गरम कढ तर कधी सुखद गारवाघेऊन भेटीला येतातपण होत्यालाही जुन्या गर्भरेशमी पैठणीतील नाचर्या मोरांची वेलबुट्टी आहे आणि त्यांना मी अजूनही अलगदमोरपिसागत जपून ठेवले आहे.....


मंद सुवासिक अत्तराच्या कुपीतील अत्तर तर उडून गेले आहेपण ती रिकामी अत्तराची कुपी मी घट्ट बंद करून अजूनही शिसवी कपाटाच्याकुलूपबंद खणात जपून ठेवली आहे . जेंव्हा कधी फार उदास एकटे एकाकी वाटते तेंव्हा मी हळूच कुणी आजूबाजूला नाहीये हे बघून ती अत्तराचीकुपी उघडते . उरलेला हलका हलका मंद सुगंध श्वासभरून घेते आणि चटकन बंद करते वर्षानुवर्ष तो असाच जतन करण्यासाठी आणि पुरवूनपुरवून वापरण्यासाठी :)

आम्ही   रोज   भेटायचो   नाहीच   जमले   तर   बोलायचो   तेही   अगदी   मनाच्या   तळापर्यंत   पोहोचेपर्यंत ,  सगळे   नितळ   स्वच्छ   दिसेपर्यं...